मुंबई, दि.१३ : भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे भारतीय वायू सेनेच्या विमानाने संध्याकाळी 5.32 मिनिटांनी आगमन झाले.
राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे यावेळी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार आशिष शेलार, मुख्य सचिव सुजाता सौनिक, राजशिष्टाचार विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, व्हॉईस अडमिरल संजय जसजीत सिंह, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, आदी मान्यवर उपस्थित होते.