मुंबई दि.२३: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील सर्व घटकांचा समतोल विकास साधणारा अर्थसंकल्प आज सादर केला, अशी प्रतिक्रिया गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिली.
मंत्री सावे म्हणाले,शेतकरी, महिला, युवक, तसेच कृषी, पायाभूत सुविधा, शहरांचा विकास आदी घटकांवर लक्ष केंद्रित करणारा हा अर्थसंकल्प आहे. शैक्षणिक कर्जावर तीन टक्के व्याज परतावा दिला जाणार असून सात लाख ५० हजार रुपयांपर्यंत विनातारण कर्ज दिले जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे ३ कोटी घरे बांधली जाणार आहे. शहरातील घरांसाठी १० लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पातून देशासह राज्याच्या विकासाला गती मिळणार आहे. याद्वारे पुढील पाच वर्षात २.५ लाख कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.