सिल्लोड येथे दि.२ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान

0
14

छत्रपती संभाजीनगर दि.२६(जिमाका)- मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाची सुरुवात दि.२ ऑगस्टपासून सिल्लोड येथून होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती राहणार आहे. जिल्ह्यात पात्र महिलांपर्यंत शासकीय यंत्रणेने योजनांचा लाभ पोहोचवून महिला सशक्तीकरणाचे ध्येय पूर्ण करावे,असे निर्देश पणनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.

जिल्हा परिषदेच्या वेरुळ सभागृहात आज पालकमंत्री श्री. सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनिल भोकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, श्रीराम पाटील, केशव तायडे तसेच सर्व यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.

माहिती देण्यात आली की, शुक्रवार दि.२ ऑगस्ट रोजी महिला सशक्तीकरण अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिल्लोड येथे होणार आहे. त्याअनुषंगाने पालकमंत्री श्री. सत्तार यांनी आज महिलांशी संबंधित योजनांचा आढावा घेतला.

महिला लाभार्थ्यांना लाभ देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे व त्यांचे सशक्तीकरण करणे हे शासनाचे ध्येय असून त्याच्या पूर्ततेत यंत्रणांनी योगदान द्यावे, असे श्री. सत्तार यांनी सांगितले. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी महिलांच्या सबलीकरणासाठी अनेक योजना लागू केल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून राज्यातील महिलांचे सक्षमीकरण करताना प्रत्येक घटकातील महिलांपर्यंत योजनांचे लाभ पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी यंत्रणांनी काम करावे,असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या नोंदणीचे काम जिल्ह्यात उत्तम होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here