मुंबई 27 – विधानपरिषद निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा 28 जुलै रोजी शपथविधी होणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देणार आहेत.
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी दि. 12 जुलै 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, भावना गवळी, कृपाल तुमाने, शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर, मिलिंद नार्वेकर, प्रज्ञा सातव या निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा रविवार दि. 28 जुलै, 2024 रोजी विधानभवनातील सेंट्रल हॉल येथे सकाळी 11 वाजता शपथविधी होणार आहे.
0000