मुंबई, दि.३१ :अपर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे आणि सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या उपस्थितीत निरोप समारंभ संपन्न झाला.
मंत्रालयातील परिषद सभागृहात आयोजित कार्यक्रमास विविध विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच राजपत्रित अधिकारी महासंघ,कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, मंत्रालयील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
मुख्य सचिव श्रीमती सौनिक म्हणाल्या की, श्री गद्रे आणि श्री भांगे यांनी त्यांच्या नोकरीच्या कालावधीत अनेक विषय हाताळून महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यांचे काम करण्याचे कौशल्य, एखाद्या विषयात सखोल अभ्यास करून निर्णय घेणे, त्यांचा आत्मविश्वास कौतुकास्पद आहे. आम्हाला त्यांच्याकडून खूप काही शिकता आले. गतीने काम करणे, कठीण परिस्थितीत संयम ठेवणे, अशा विविध गोष्टी शिकता आल्या.निवृत्ती हा जीवनातील एक नवीन टप्पा मानला जातो.आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश म्हणजे सेवानिवृत्तीचे आयुष्य आरोग्यदायी,आनंदी जावे यासाठी त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी मुख्य सचिव मनोज सौनिक,सचिव विकास खारगे, राधिका रस्तोगी,अधिकारी,कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
000
राजू धोत्रे/विसंअ