मुंबई, दि. १ : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव गोविंद पवार, कक्ष अधिकारी संभाजी जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक कक्ष अधिकारी विजय शिंदे यांनीही अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
00000
प्रवीण भुरके /विसंअ