उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बोरकरवाडी येथील पाणीपुरवठा कामाचे भूमिपूजन

0
8

बारामती, दि.४:  उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेतून बोरकरवाडी तलावात बंदिस्त पाईपलाईनद्वारे करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी जलसंपदा यांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता प्रकाश भोसले, पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डूबल, नितीन जैस्वाल, शाहेद काझी, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी अनिल बागल, जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेचे उपअभियंता पी.डी. धुमाळ, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक पुरूषोत्तम जगताप, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रणजित तावरे,  कृषी उत्पन्न बाजार समितीचेसंचालक अरूण सकट, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव आदी उपस्थित होते.

पाणी पुरवठा योजनेचे काम टी. सी.एस. फाऊंडेशनच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून करण्यात येणार आहे. जानाई शिरसाई उपसा सिंचन पाणी पुरवठा योजनेतून बोरकरवाडी तलावात ९०० मिमी व्यास पाईपलाईनद्वारे  ३३.२१ क्यूसेक पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. तलावाची पाणी क्षमता ४३ दस लक्ष घन फुट असून पाईपलाईनची लांबी २.५ किमी आहे. या पद्धतीने तलाव भरण्यास १४ दिवस लागणार आहे. या तलावामुळे कुतवळवाडी-बोरकरवाडी परिसराला लाभ होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here