‘सेफ वेब फॉर चिल्ड्रन’ कार्यक्रमाचे उद्या उद्घाटन

मुंबई, दि. ५ : राज्य बाल हक्क संरक्षण आयोग मुलांचे ऑनलाईन लैंगिक शोषण आणि अत्याचार विरुद्ध लढा या उपक्रमांतर्गत (‘SAFE WEB FOR CHILDREN’) सेफ वेब फॉर चिल्ड्रन हा कार्यक्रम राबवित आहे. या कार्यक्रमाचा प्रारंभ उद्या  ६ ऑगस्ट  २०२४  रोजी दुपारी ४ वाजता, सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल येथे होणार आहे.

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग व चाईल्ड फंड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने मुलांच्या हक्कांचे संरक्षण आणि मुलांचे ऑनलाईन लैंगिक शोषण व गैरवर्तन यापासून संरक्षण करणे या उद्देशाने मुलांसाठी ऑनलाईन सुरक्षिततेचा उपक्रम राज्यात राबविण्यात येणार आहे. या उद्घाटन सोहळ्यास महिला व बालविकास विभाग मंत्री आदिती तटकरे आणि शालेय शिक्षण विभागाचे मंत्री दीपक केसरकर हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

ऑनलाईन लैंगिक शोषणासंबंधी राज्यातील सर्व वयोगटातील मुले व सर्वसामान्यांमध्ये जनजागृती व्हावी आणि प्रचार, प्रसार, व्हावा यासाठी जिल्हास्तरावर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. असे  राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा अॅड. सुशीबेन शाह यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

काशीबाई थोरात/विसंअ