बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी अर्ज करण्यासाठी १४ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

मुंबई दि. ६:  सन २०२४-२५ मध्ये योजनेंतर्गत चालू हंगामामध्ये ‘बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपा’चा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जाद्वारे करण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र शेतकऱ्यांसाठी  महाडीबीटी पोर्टलवर दि. १४ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अर्जकरण्यासाठी  मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

कापूस, सोयाबीन व इतर  तेलबिया आधारित पीक पद्धतीस चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देणे या उद्देशाने  राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षात राबविण्यात येत आहे.

शेतकऱ्यांनी  mahadbt.maharashtra.gov.in farmer login या वेबसाईट वर जाऊन जास्तीत-जास्त ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी / उप विभागीय कृषी अधिकारी / तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

0000

अर्ज करणेबाबतची कार्यवाही

अर्ज करणे साठी वेबसाईट

https://mahadbt.maharashtra.gov.in

लाभार्थी (शेतकरी ) “युजर आयडी व पासवर्ड” टाकणे

“अर्ज करा” या बाबीवर क्लिक करणे

“कृषी यांत्रिकीकरण” बाबीवर क्लिक करणे

“मुख्य घटक” बाबीवर क्लिक करणे

“तपशील” बाबीवर क्लिक करून –

“मनुष्यचलित औजारे घटक निवड”

“यंत्र / औजारे व उपकरणे – पिक संरक्षण औजारे”

“बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप (कापूस किंवा सोयाबीन)” बाब निवडणे

जतन करणे