मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेबाबत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत

0
64

मुंबई, दि.22:  मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेबाबत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची मुलाखत ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात प्रसारित होणार असून पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही श्री. भुजबळ यांनी कार्यक्रमाद्वारे केले आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातील मुलाखतीत अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री.भुजबळ यांनी ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने’ची वैशिष्ट्ये, कार्यपद्धती तसेच याद्वारे होणारे लाभ याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत, शुक्रवार दि.23, आणि शनिवार दि. 24 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार दि. 23 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 7.30 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स- https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यूट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

—— 000 —–

केशव करंदीकर/व.स.सं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here