मुंबई,दि.२९ : रायगड जिल्ह्यातील घेरावाडी, मोदिमाळ व हश्याची पट्टी येथील मुलभूत सोयी-सुविधांची कामे प्राधान्याने करावीत, अशा सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केल्या.
मंत्रालयातील परिषद सभागृह येथे घेरावाडी,मोदिमाळ व हश्याची पट्टी येथील मुलभूत सोयी-सुविधांच्या कामासंदर्भात बैठक झाली. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यासह अधिकारी उपस्थित होते.
वनमंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले की, पनवेल तालुक्यातील कर्नाळा अभयारण्य परिसरातील घेरावाडी येथील पुनर्वसन, मोदीमाळ ठाकूरवाडी (सपने) (ता.पनवेल), हश्याची पट्टी, (ता.खालापूर) या गावातील मुलभूत सोयी-सुविधासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. आवश्यक सर्व विभागांच्या परवानग्या घेऊन योग्य ती कार्यवाही करावी. त्याचप्रमाणे मुलभूत सोयी सुविधांची मंजूर झालेली कामे विहित वेळेत पूर्ण करण्यास प्रशासनाने प्राधान्य द्यावे, अशा सूचना वनमंत्री श्री.मुनगंटीवार यांनी केल्या.
००००
संध्या गरवारे/विसंअ