जिल्हा दक्षता समितीवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीसाठी ७ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि.३ : मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीसाठी इच्छुक उमेदवारांनी ७ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केले आहे.

मुंबई उपनगर जिल्हाकरिता पाच अशासकीय सदस्याची नियुक्ती करावयाची आहे. तरी इच्छुक असलेल्या व्यक्तीनी अर्ज व अर्जासोबत जीवन परिचय कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत दिनांक ७ सप्टेबर २०२४ पूर्वी सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर, प्रशासकिय इमारत, ४ था मजला, आर.सी. मार्ग, चेंबूर (पू), मुंबई-७१. ई-मेल acswomumbaisub@gmail.com यावर किंवा कार्यालयात सादर करावा.

अशासकिय सदस्य पात्रतेचे नियम पुढील प्रमाणे आहेत, १) सदस्य अनुसूचित जाती, जमातीचा असावा.२) सदस्यास सामाजिक क्षेत्रात कार्य केल्याचा अनुभव असावा. ३)सदस्यास अनुसूचित जाती, जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ कायदयाचे ज्ञान असावे. विधी शाखेची पदवी (LLB,LLM) असलेले सदस्यांना प्राधान्य राहील.४. सदस्य मुंबई उपनगर क्षेत्रात राहणारा असावा.

००००

शैलजा पाटील/विसंअ