भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या अवतार दिनानिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई,दि.५ : महानुभाव पंथाचे संस्थापक, लीळाचरित्रकार भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या अवतार दिनानिमित्त (जयंती) कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रालयात चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव दीपक मोरे, अवर सचिव सचिन कावळे, कक्ष अधिकारी घनश्याम जाधव, विजय शिंदे, नितीन राणे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.

00000

धोडिंराम अर्जून/स.सं