गणेशमूर्ती विक्रीतून ‘लखपती दिदी’चा श्री गणेशा; भाविकांनी केली ९० हजार मूर्ती खरेदी

0
7

छत्रपती संभाजीनगर दि.५ : १८३ बचत गटाच्या महिला आणि त्यांनी तयार केलेल्या २ लाख ५१ हजार ४८५ गणेशमूर्ती . ह्या मुर्तीच्या विक्रीसाठी ‘उमेद’ मार्फत सुरु करण्यात आलेली १७५ हून अधिक विक्री केंद्र. महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेने हे प्रयत्न म्हणजे महिला बचत गटांच्या महिलांना ‘लखपती दिदी’बनविण्यासाठीचा श्रीगणेशाच होय. दि. ३ पासून सुरु झालेल्या या स्टॉल्सवर पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात ९० हजार मुर्ती भाविकांनी खरेदी केल्या असून आतापर्यंत १ कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल झाली आहे.

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बचत गटाच्या महिलांचे उत्पन्न वाढविण्यासाठी त्यांना सहाय्य करणारी ‘लखपती दिदी’ ही योजना सुरु केली आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत ‘उमेद’ अभियानांतर्गत महिला बचत गटांतील महिलांनी तयार केलेल्या श्री गणेशाच्या मूर्ती विक्री करता याव्या यासाठी जिल्ह्याभरात १७५ हून अधिक ठिकाणी स्टॉल्स उघडण्यात आले आहे. यंदाचे हे या उपक्रमाचे दुसरे वर्ष आहे. जिल्हा परिषदेच्या प्रांगणातही एक भव्य स्टॉल आहे. या स्टॉल्सवरील गणेश मुर्ती खरेदी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर मधील गणेश भक्तांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. दि.३ पासून सुरु झालेल्या या स्टॉल्सवर पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात ९० हजार मुर्ती भाविकांनी खरेदी केल्या असून आतापर्यंत १ कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल झाली आहे, अशी माहिती विपणन अधिकारी सचिन सोनवणे यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या प्रांगणात असलेल्या मुर्ती विक्री स्टॉलला भेट दिल्यानंतर श्री गणेशाचे लोभस रुप पाहून महिलांच्या कलाकुसरीसाठी तोंडातून आपसुक दाद बाहेर पडते. श्री गणेशाच्या कृपाळू नजर भाविकांचे लक्ष खिळवून ठेवते. गणेश मूती खरेदी केल्यानंतर भाविकांना दिलेला क्यू आर कोड  स्कॅन करून बाप्पा सोबत सेल्फि अपलोड करण्याची सुविधाही आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असून स्वयंसहायता समूहातील महिलांनी तयार केलेल्या श्री गणपती मूर्ती नागरिकांनी खरेदी कराव्या असे आवाहन त्यांनी गणेश भक्तांना केले आहे.

यंदा १८३  बचत गटाच्या महिलांनी २ लाख ५१ हजार ४८५ मूर्ती तयार केल्या आहेत. जिल्ह्यात १७५ ठिकाणी विक्री केंद्र सुरु केली आहेत. विशेष म्हणजे बाजारातील अन्य मुर्तीपेक्षा या मुर्ती अधिक स्वस्त आणि माफक दरात उपलब्ध आहेत. शिवाय त्यावर १० टक्के सवलत सुद्धा आहे.

गणेशमूर्ती खरेदीसाठी संपर्क :

धनश्री महिला स्वयंसहायता समूह, कनकशिळ ता.खुलताबाद – 9403414250

श्रीकृष्ण महिला स्वयंसहायता समूह मांडवा ता.गंगापूर 774804155

ब्रह्मकमळ महिला स्वयंसहायता समूह, रांजणगाव शे. ता. गंगापूर – 7972694549

संत गोरोबाकाका महिला स्वयंसहायता समूह गोळेगाव ता. खुलताबाद – 8459871748

माऊली महिला स्वयंसहायता समूह, तुर्काबाद ता.गंगापूर 96237B967

जिजाऊ महिला स्वयंसहायता समूह, पोखरी, ता. छत्रपती संभाजीनगर -9175141590

श्रीगणेश महिला स्वयंसहायता समूह, ताडपिंपळगाव ता.कत्रड़- 7887924347

संतोषीमाता महिला स्वयंसहायता समूह, म्हसला बु. ता.सिल्लोड – 9325288432

श्री स्वामी सम्थ महिला स्वयंसहायता समूह, मनुर, ता.वैजापूर – 8329834032

सावित्रीबाई पुले महिला समूह पिंप्री बू. ता. छম्रपती संभाजीनगर – 992196485

महालक्ष्मी महिला स्वयंसहायता समूह, चितेगाव, ता. छ.संभाजीनगर – 8788254685

आनंदी महिला स्वयंसहायता समूह ताडपिंपळगाव ता.कन्नड -702060567

०००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here