ई-रिक्षामुळे महिलांचे उद्योग व आर्थिक बळकटीकरणाला चालना मिळेल – पालकमंत्री संजय राठोड

0
12

Ø  पालकमंत्र्यांच्याहस्ते महिला गटांना रिक्षाचे वितरण

Ø  जिल्ह्यात महिला गटांना ५०० रिक्षांचे वाटप करणार

Ø  वटफळी येथे एक हजार महिलांसाठी गारमेंट क्लस्टर

यवतमाळ, दि.9 (जिमाका) : माविमच्या महिला गटांना आपण तेजस्विनी कृषि माल वाहतूक ई-रिक्षाचे वाटप करतो आहे. या रिक्षामुळे महिलांच्या विविध उद्योग व्यवसायाला चालना मिळेल आणि त्यांच्या आर्थिक बळकटीकरणाला मदत होईल, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

प्रधानमंत्री खनिकर्म योजनेंतर्गत लोक संचालित साधन केंद्र नेरच्यावतीने नेर तालुक्यातील 36 महिला बचत गटांना तेजस्विनी कृषि माल वाहतूक ई-रिक्षाचे वाटप पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

स्वागत मंगल कार्यालय, नेर येथे आयोजित या कार्यक्रमास नेहरू महाविद्यालयाचे संस्थापक परमानंद अग्रवाल, नेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज नाल्हे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक स्नेहल भाकरे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी डॅा.रंजन वानखडे, माजी नगर परिषद सभापती भाऊराव ढवळे, सामाजिक कार्यकर्ते नामदेवराव खोब्रागडे आदी उपस्थित होते.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने लोक संचालित साधन केंद्र नेरच्यावतीने प्रधानमंत्री खनिकर्म योजना अंतर्गत सदर ई-रिक्षाचे वितरण करण्यात आले. नेर तालक्यातील माविमच्या 36 महिला बचत गटास सदर ई-रिक्षाचे वाटप  करण्यात आले. यावेळी लोक संचालित साधन केंद्र, नेरच्या महिला बचत गटाला बँक कर्जाचे चेक वितरण आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्याच्या स्टाफला प्रमाणपत्र देऊन पालकमंत्री श्री.राठोड यांच्याहस्ते गौरविण्यात आले.

जिल्ह्यात माविमच्या महिला बचत गटाला ५०० ई-रिक्षा वितरीत करण्यात येईल तसेच नेर तालुक्यातील वटफळी गावाजवळ महिला बचत गटातील एक हजार महिलांकरिता गारमेंट क्लस्टर उभारणी करण्यात येणार असल्याचे यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले. ई-रिक्षाद्वारे महिलांच्या विविध उद्योग व्यवसायाला चालना मिळेल आणि महिलांना आर्थिक बळकटीकरणला मदत होईल, असे पालकमंत्री म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here