मुंबई, दि. 17 : केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती मंत्रालयात साजरी करण्यात आली. याप्रसंगी कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव, सचिन कावळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
0000