मुंबई, दि. 25 : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अंत्योदय दिवस साजरा करण्यात आला. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव दीपक मोरे, अवर सचिव सचिन कावळे, सहायक कक्ष अधिकारी विजय शिंदे यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
0000
धोडिराम अर्जुन /स.सं