‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ पात्र लाभार्थ्यांना ३० सप्टेंबर पर्यंत मिळणार तिसरा हप्ता – पालकमंत्री गुलाबराव पाटील

0
71

पात्र लाभार्थी केवळ केवायसी, आधार सिडींग नसल्यामुळे वंचित; ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी २६ सप्टेंबर रोजी तालुका स्तरावर होणार बैठक

जळगाव दि. 25,( जिमाका )  – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता पात्र लाभार्थी यांच्या खात्यात 30 सप्टेंबर पर्यंत येणार असून जिल्ह्यातील 1 लाख 7 हजार 222 पात्र लाभार्थी बहिणींचे केवायसी, आधार सिडींग नाही त्यामुळे त्या या लाभापासून वंचित आहेत. याबाबत सर्व बँकाच्या प्रतिनिधीची बैठक प्रांत आणि तहसीलदार 26 सप्टेंबर रोजी घेतील. त्यात ज्या पात्र बहिणींचे केवायसी आणि आधार सिडींग नाही ते युद्ध पातळीवर पूर्ण करावेत, असे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

जिल्हा नियोजन भवन मध्ये आयोजित बैठकीत हा आढावा घेण्यात आला. या बैठकीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. अंकुश, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, महिला आणि बाल कल्याण अधिकारी वनिता सोनगत यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यात 9 लाख 74 हजार 950 एवढे अर्ज दाखल झाले. त्यातील 9 लाख 61 हजार 8 एवढ्या बहिणी पात्र झाल्या आहेत. त्यांना 1500 रुपयाचे दोन हप्ते प्रदान करण्यात आले आहेत. त्यातील 1 लाख 7 हजार 222 एवढ्या बहिणीच्या खात्यावर केवळ केवायसी आणि आधार सिडींग नसल्यामुळे पैसे पडले नाहीत. ती प्रक्रिया पूर्ण होताच त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील अशी माहितीही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिली.

सर्व प्रांत, तहसीलदार, गट विकास अधिकारी यांनी यात लक्ष घालून ग्राम स्तरावरची यंत्रणेकडून येत्या दोन दिवसात हे काम पूर्ण करून घ्यावे असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली.तसेच आधार सिडींग नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनाही पीकविमा सह विविध योजनांचे पैसे मिळाले नाहीत, या विशेष मोहिमेत त्यांचेही आधार सिडींग करून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

यावेळी तालुकास्तरावरील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे समिती सदस्य यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यावर योग्य ते कार्यवाही करण्याची सूचना जिल्हाधिकारी यांनी तालुका प्रशासनाला दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here