छाननीनंतर २८७ मतदारसंघात ७ हजार ०५० उमेदवारांचे अर्ज वैध

५६ - नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघात २२ उमेदवारांचे अर्ज वैध

मुंबई, दि. 31 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि.29 ऑक्टोबर 2024 रोजीपर्यंत राज्यातील 288 मतदारसंघांसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याचा अखेरच्या दिवसापर्यंत 7 हजार 995 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. या नामनिर्देशन पत्रांची दि. 30 ऑक्टोबर रोजी छाननी करण्यात आली. राज्यातील 287 मतदारसंघातील एकूण 7 हजार 967 उमेदवारांपैकी 7 हजार 050 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत, तर 917 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत.

56 – नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघात 27 उमेदवारांपैकी 22 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले तर 04 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. या मतदारसंघातील एका उमेदवाराच्या अर्जाची छाननी ( 31 ऑक्टोबर) पुढे ढकलण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
00000