‘दिलखुलास’ कार्यक्रमात भंडारा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. संजय कोलते यांची उद्या मुलाखत

मुंबई, दि. ५ : राज्यात २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूकीच्या मतदानाची तर २३ नोव्हेंबर रोजी निवडणूक निकाल प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘भंडारा जिल्हा प्रशासनाची तयारी’ बाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. संजय कोलते यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत उद्या बुधवार दि. ६ नोव्हेंबर २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. जिल्हा माहिती अधिकारी भंडारा शैलजा वाघ-दांदळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

विधानसभा निवडणूक-२०२४ शांततेत पार पडावी यासाठी राज्य निवडणूक आयोगामार्फत प्रत्येक जिल्हास्तरावर काटेकोरपणे नियोजन करण्यात आले आहे. आचारसंहितेच्या काळात नागरिकांनी कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर कोणकोणत्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाच्या या प्रक्रियेत सहभाग घेवून मतदानाचा हक्क बजावावा यासाठीचे कोणते उपक्रम राबविण्यात येत आहेत. याविषयी माहिती डॉ. कोलते यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.

०००