‘दिलखुलास’ कार्यक्रमात दंत शल्यचिकित्सक डॉ. अर्चना पवार यांची मुलाखत

मुंबई, दि. 25 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘मौखिक आरोग्य आणि खबरदारी’ या विषयावर ठाणे जिल्हा, शासकीय रूग्णालयाच्या, दंत शल्यचिकित्सक डॉ. अर्चना पवार यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

जगभरात मौखिक आरोग्याच्या दृष्टीने विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येतात. मौखिक आरोग्याचा मनुष्याच्या सामान्य आरोग्याशी घनिष्ठ संबंध असून दातांची कीड, हिरड्याचे आजार, मुखदुर्गंधी, तंबाखूमुळे होणारे मुखाचे आजारांचा प्रामुख्याने मौखिक आरोग्यात याचा समावेश होतो. वाढत्या वयानुसार होणाऱ्या आजारांचा आणि औषधांचाही ज्येष्ठांच्या मौखिक आरोग्यावर परिणाम होतो. त्याअनुषंगाने मौखिक आजाराचे प्रकार आणि या आजारांबाबत काय काळजी घेणे आवश्यक आहे, याबाबत ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून डॉ. अर्चना पवार यांनी माहिती दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. पवार यांची मुलाखत शुक्रवार दि. 27, शनिवार दि. 28, सोमवार दि.30 आणि मंगळवार दि.31 डिसेंबर 2024 तसेच बुधवार दि. 1 जानेवारी 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे, निवेदक सुचिता गरूडे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

०००