राजधानीत डॉ. पंजाबराव देशमुख जयंतीदिनी अभिवादन

नवी दिल्ली, 27: देशाचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख  यांच्या जयंतीदिनी महाराष्ट्र सदन येथे त्यांना अभिवादन करण्यात आले.

कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महाराष्ट्र सदनातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात डॉ. पंजाबराव देशमुख जयंतीदिनी अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात डॉ. पंजाबराव देशमुख जयंतीदिनी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक (माहिती) अमरज्योत कौर अरोरा यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. उपस्थित कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

००००

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.161 / दिनांक 27.12.2024