मुंबई, दि.२७ :सैनिकी मुलींचे वसतिगृह कलिना, सांताक्रुज पूर्व, मुंबई येथे अतिरिक्त सहाय्यक अधिधिका पदकंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी दि.१५ जानेवारी, २०२५ रोजीपर्यंतअर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रां.प्र.जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
या पदासाठी अर्जदार ही युध्द विधवा किंवा सैन्य सेवेत मृत्यू पावलेल्या सैनिकाची पत्नी किंवा माजी सैनिक, आजी सैनिक यांची पत्नी असावी (युध्द विधवेस/विधवेस प्राधान्य). शिक्षण दहावी उत्तीर्ण असावे तसेचएम.एस.सी.आय.टी. पास व टायपिंग येणा-यास प्राधान्य. वयोमर्यादा -४५ वर्षाच्या आत. मानधन दरमहा २४ हजार, ४७७ इतके आहे.
अर्जासोबत युध्द विधवा,विधवा, माजी, आजी सैनिक पत्नी असल्याचे प्रमाणपत्र व शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती जोडाव्यात. निवड प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचे आयत्यावेळी बदल करण्याचे अधिकार राखून ठेवणेत आले असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई उपनगर, द्वारा सैनिकी मुलींचे वसतिगृह, कलिना, डायमंड आवा हॉस्टेलच्या मागे, हंस भुंग्रा मार्ग, सांताक्रुझ (पु.), मुंबई-४०००५५. दूरध्वनी : ०२२-३५०८३७१७ येथे संपर्क साधावा.
00000
मोहिनी राणे/स.सं