मुंबई, दि. 7 : “सिद्धांता नॉलेज फाउंडेशन” (IKS – Indic Knowledge Systems) एक शैक्षणिक फाऊंडेशन असून भारतीय ज्ञान परंपरा, तत्त्वज्ञान, संस्कृती, आणि इतर प्राचीन शास्त्रांमध्ये असलेल्या ज्ञानाचे संवर्धन, अभ्यास आणि प्रसार करण्याचे काम करत आहे. आयकेएस (Indic Knowledge Systems) सामान्यतः भारताच्या प्राचीन ज्ञान परंपरेचे पुनरावलोकन, संवर्धन आणि आधुनिक संदर्भात त्याचे मूल्यांकन करण्याचे कार्य करते. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अंमलबजावणी करताना या संस्थेचे विद्यापीठाने सहकार्य घ्यावे आणि आराखडा तयार करावा, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बैठकीत सांगितले.
मुंबई विद्यापीठ आणि सिध्दांता नॉलेज फाऊंडेशन (आयकेएस) यांच्या समवेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण संदर्भात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तंजावरचे महाराजा राजे बाबाजी भोसले, गायत्री राजे भोसले, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी,एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू उज्ज्वला चक्रवर्ती, सिद्धांता नॉलेज फाउंडेशनचे अध्यक्ष जयकिशन झवेरी, कार्यकारी संचालक सुदर्शन जी, सत्या अत्रेयम, महाराजा तंजावर टीम प्रीत खोना, वरिष्ठ प्रबंधक प्रमोद निशाणकर उपस्थित होते.
सिद्धांता नॉलेज फाउंडेशनने तयार केलेला अभ्यासक्रम विद्यापीठात व महाविद्यालय स्तरावर, भारतीय ज्ञान परंपरेच्या अभ्यासक्रमाशी मॅपिंग करून युजी आणि पीजीच्या विद्यार्थ्यांसाठी राजे बाबाजी भोसले, तंजावर व सिद्धांता नॉलेज फाउंडेशनच्या समन्वयाने लागू करता येईल का यावर चर्चा करण्यात आली.
000
काशीबाई थोरात/विसंअ/