वस्त्रोद्योग मंत्री  संजय सावकारे यांच्या हस्ते आयुक्तालयाच्या संकेतस्थळाचे अनावरण

मुंबई, दि. 7 : वस्त्रोद्योग विभागाने एनआयसी द्वारे (NIC) ‘ स्वास’ प्लॅटफॉर्मवर विकसित केलेल्या वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या https://www.dirtexmah.gov.in या संकेतस्थळाचे वस्त्रोद्योग मंत्री  संजय सावकारे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

मंत्रालयात आज वस्त्रोद्योग विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. यावेळी वस्त्रोद्योग सचिव विरेंद्र सिंह, आयुक्त संजय दैने, उपसचिव श्रीकृष्ण पवार, श्रद्धा कोचरेकर उपस्थित होते.

या संकेतस्थळावर वस्त्रोद्योग विभागाच्या धोरणांतर्गत विविध योजना, अनुदान आणि वस्त्रोद्योग क्षेत्रातील अद्ययावत सर्वसमावेशक माहिती यांचा अंतर्भाव आहे. तसेच हे संकेतस्थळ वापरकर्त्यांना सुलभरित्या हाताळण्यायोग्य बनविण्यात आले आहे. सर्व प्लॅटफॉर्मवर प्रवेशयोग्यता सुनिश्चित करण्यासाठी मोबाइलसारख्या सर्व उपकरणांद्वारे वापरता येईल, अशी सोय करण्यात आली आहे.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/