केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले श्री शनैश्वराचे दर्शन

अहिल्यानगर, दि.१२- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिशिंगणापूर येथे श्री शनैश्वराचे दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी गृहमंत्र्यांच्या हस्ते श्री शनैश्वर मूर्तीस व उदासी महाराज मठात अभिषेकही करण्यात आला.

यावेळी जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील उपस्थित होते.

श्री शनिशिंगणापूर संस्थांनचे अध्यक्ष भागवत बानकर, उपाध्यक्ष विकास बानकर यांनी गृहमंत्री अमित शाह यांना शनिदेवाची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सन्मान केला.

तत्पूर्वी श्री. शाह यांचे हेलिपॅडवर आगमन झाले. अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी त्यांचे स्वागत केले.