मुंबई, दि. १५ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून संध्याकाळी प्रयाण झाले.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, पणन, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, आमदार रवींद्र चव्हाण यांनी निरोप दिला. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर पाटणकर, अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय सक्सेना तसेच पोलिस व राजशिष्टाचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.