छत्रपती संभाजीनगर, दि.१९(जिमाका)- वैजापूर तालुक्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून भरघोस निधी देऊ व येथील जनतेची कामे करु असे आश्वास्न राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी आज तलवाडा ता. वैजापूर येथे केले.तलवाडा येथे शिऊर बंगला ते नांदगाव यामार्गाच्या भूमिपुजन कार्यक्रमात ते बोलत होते.
तलवाडा येथे पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते शिऊर बंगला ते नांदगाव मार्गाचे सिमेंट कॉंक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन आज करण्यात आले. आमदार प्रा. रमेश बोरनारे, कन्नडच्या आमदार संजना जाधव, माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, अभय चिकटगावकर, राजेंद्र जंजाळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
त्यानंतर पालकमंत्री शिरसाट यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला. संजय निकम, साबेर खान, राजीव डोंगरे, बाबासाहेब जगताप, ज्ञानेश्वर जगताप,भागीनाथ मगर, रामहरी जाधव, राजेंद्र मगर, नारायण कवडे, विशाल शेळके, संजय बोरनारे, कल्याण दंगोडे, रिखाब पाटणी, कचरू डिके, उत्तमराव निकम, एल एम पवार,गोरख आहेर, प्रशांत शिंदे,प्रभाकर जाधव, अंबादास खोसे, बाबासाहेब राऊत, किशोर मगर, अनिल भोसले, संतोष सूर्यवंशी, शांताराम मगर, राजेंद्र साळुंके, सुभाष आव्हाळे, राधाकृष्ण सोनवणे, प्रमोद मगर, भारत साळुंके, डॉ अर्जुन साळुंके, बाळासाहेब जाधव, यांच्यासह तलवाडा, शिऊर, लोणी खुर्द, वाकला आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
०००००