जन्म-मृत्यू नोंदणीसाठी लवकरच आदर्श कार्यप्रणाली – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. 12 : जन्म-मृत्यू नोंदणी करताना संबंधित व्यक्ती भारताचे नागरिक असल्याची खात्री करुन दाखला देण्याबाबत गृह विभागामार्फत लवकरच आदर्श कार्यप्रणाली निश्चित करण्यात येत असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

ठाणे जिल्ह्यात उशिरा जन्म व मृत्यू नोंदणी प्रकरणास स्थगिती आणल्याबाबत ॲड. सरिता सैंदाणे यांच्या निवेदनासंदर्भात मंत्रालयातील दालनात बैठक झाली. मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी यावेळी उपस्थित होते.

जन्म नोंदणी होणे आवश्यक असल्याने याबाबत गृह विभागामार्फत कार्यवाही करण्यात येत आहे. लवकरच याबाबतची आदर्श कार्यप्रणाली निश्चित होईल, असे श्री.बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.

0000