‘९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ व ‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ. प्रमोद मुनघाटे यांची मुलाखत

मुंबई दि. 14 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ’98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ व ‘मराठी भाषा गौरव दिनानिमित्त’ साहित्य अकादमीच्या केंद्रीय मंडळाचे तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे सदस्य, ज्येष्ठ साहित्यिक व अभ्यासक डॉ. प्रमोद मुनघाटे यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ. मुनघाटे यांच्या मुलाखतीचे दोन भागात प्रसारण होणार आहे. या मुलाखतीचा पहिला भाग मंगळवार दि. 18 आणि दुसरा भाग मंगळवार दि. 25 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत पाहता येणार आहे. निवेदिका शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्याची घोषणा केली. ‘९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ नवी दिल्ली येथे २१, २२ आणि २३ फेब्रुवारी, २०२५ या कालावधीत होत आहे. भाषा, संस्कृती, राष्ट्रभावना, मानवता आणि एकात्मता यांचा आगळा मिलाफ यानिमित्ताने महाराष्ट्र वा देशातीलच नव्हे, तर अवघ्या जगातील साहित्यरसिकांना देशाच्या राजधानीत अनुभवता येणार आहे. या निमित्तानेच ‘मराठी भाषेचा उगम ते अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळण्यापर्यंतचा प्रवास याविषयी डॉ. मुनघाटे यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात माहिती दिली आहे.