मुंबई दि.15: संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्री कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता व नाविन्यता, तथा मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी मंत्रालयात आयोजित कार्यक्रमास सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव सचिन कावळे, यांच्यासह राजेंद्र बच्छाव, मेघा गवळी तसेच मंत्रालयीन विविध विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गुलाबपुष्प अर्पण करून संत सेवालाल महाराजांना अभिवादन केले.
000