नूतनीकृत पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलाचे उद्या उद्घाटन

मुंबई, दि. २ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे नूतनीकृत संकुल उद्या रविवार, दि. २ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता उद्घाटनासाठी सज्ज झाले असून हा उद्घाटन समारंभ रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे आयोजित करण्यात आला आहे.

उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राहणार असून, त्यांच्या शुभहस्ते या संकुलाचे लोकार्पण होणार आहे. तसेच, या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री, मुंबई शहर एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार, कौशल, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, खासदार अनिल देसाई आणि आमदार महेश सावंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमानिमित्त विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये संजय मोने, पुष्कर श्रोत्री, सुभाष नकाशे, नंदेश उमप, रोहन पाटील व अन्य कलाकारांचा समावेश आहे.

00000