उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे मुंबईत आगमन

मुंबई दि. 6 – उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे दुपारी  3.45 वाजता आगमन झाले. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, ॲडमिरल सुदीप के.वर्मा, ब्रिगेडियर ए.के. शर्मा शेरिंग दोरजे, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, अतिरिक्त पोलिस महासंचालक  तसेच पोलिस व राजशिष्टाचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

0000

प्रभू कदम/विसंअ