खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची ‘मऱ्हाटी’ एम्पोरियमला भेट

नवी दिल्ली, दि. १८ : शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आज महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या ‘मऱ्हाटी’ एम्पोरियमला भेट दिली.

दिल्लीच्या बाबाखडक सिंग मार्गावरील महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या ‘मऱ्हाटी’ एम्पोरियममध्ये श्री. वाकचौरे यांनी विविध उत्पादने पाहिली व महामंडळाच्या कार्यपद्धतीची माहिती घेतली. या भेटीदरम्यान महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी माहिती अधिकारी अंजु निमसरकर उपस्थित होत्या.

यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या विविध उपक्रमांविषयीही जाणून घेतले. उपसंचालक श्रीमती अरोरा यांनी केंद्राद्वारे राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.

0000