न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्टोफर लक्सेन यांची वानखेडे स्टेडियमला भेट

मुंबई, दि. २० : न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्टोफर लक्सेन दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आले असून त्यांनी वानखेडे स्टेडियमला शिष्टमंडळासह भेट दिली.

या भेटीदरम्यान प्रधानमंत्री लक्सेन यांनी स्टेडियममधील अत्याधुनिक सुविधांची पाहणी केली. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या  (MCA) अधिकाऱ्यांनी वानखेडे स्टेडियमचा वारसा आणि येथील क्रिकेट संस्कृतीबद्दल व स्टेडियम स्थापनेपासूनच्या महत्त्वाच्या घडामोडी सांगितल्या. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या व्यवस्थापनाखाली हे स्टेडियम सातत्याने अद्ययावत ठेवले जात असल्याची माहितीही देण्यात आली. यावेळी लक्सेन यांनी मैदानावर क्रिकेट खेळण्याचा आनंदही घेतला.

0000

मोहिनी राणे/ससं/