‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२५’ साठी अर्ज करण्याचे आवाहन

अर्ज स्वीकारण्यास १ एप्रिल २०२५ पासून सुरुवात, अंतिम मुदत ३१ जुलै २०२५

नवी दिल्ली, दि. २८ :  केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025’ साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुकांनी https://awards.gov.in या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावा.

हा पुरस्कार दरवर्षी देशतील ५ ते १८ वर्षाखालील असामान्य गुणवत्ताधारक मुलांना प्रदान करुन सन्मानित करण्यात येते. शौर्य, क्रीडा, समाजसेवा, विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण, कला व संस्कृती या क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो.

या पुरस्कारासाठी कोणतेही भारतीय नागरिकत्व असलेले व भारतात वास्तव्यास असलेले ५ ते १८ वर्षे वयोगटातील मुले पात्र आहेत. अर्जदार स्वतः अर्ज करू शकतात तसेच इतर कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेद्वारे त्यांचे नाव नामांकनासाठी सुचवले जाऊ शकते. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने १ एप्रिल २०२५ ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी https://awards.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

000