राष्ट्रपतींचे मुंबईत आगमन; राज्यपालांकडून स्वागत

मुंबई, दि.३१: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज एक दिवसाच्या शासकीय भेटीसाठी मुंबई येथे आगमन झाले. राजभवन येथे आगमनप्रसंगी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांचे स्वागत केले. राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि. १ एप्रिल) रिझर्व्ह बँकेचा ९० वा स्थापना दिन साजरा होणार आहे.

President Murmu arrives in Mumbai; Governor welcomes President

President of India Droupadi Murmu arrived in Mumbai on an official visit. Maharashtra Governor C P Radhakrishnan welcomed the President at Raj Bhavan Mumbai.

The President will attend the 90th Foundation Day Commemoration of the Reserve Bank of India on Tuesday (1 April).