मुंबई, दि.२ : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक नियोजित वेळापत्रकानुसारच गुरुवार दि. ३ एप्रिल रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे. या निवडणुकीत नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे सचिव धीरज कुमार यांनी केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने SLP No. ८५७६/२०२५ या याचिकेमध्ये विद्यमान निर्वाचन अधिकाऱ्यांऐवजी “अवर सचिव स्तराचे नवीन निर्वाचन अधिकारी” तात्काळ नियुक्त केल्यास निवडणूक प्रक्रिया पुढे सुरू ठेवता येईल असे निर्देश २ एप्रिल २०२५ रोजीच्या आदेशान्वये दिले आहेत. या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणूक घेण्याकरिता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे अवर सचिव सुनीलकुमार धोंडे यांची नियुक्ती निर्वाचन अधिकारी म्हणून करण्यात आली आहे, असेही सचिव धीरज कुमार यांनी कळविले आहे.
00000
अर्चना देशमुख/विसंअ