मुंबई दि.९ : मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीसाठी इच्छुक उमेदवारांनी १७ एप्रिल २०२५ पूर्वी अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्याकरिता पाच अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचे अशासकीय सदस्य आणि बिगर मागासवर्गीय संस्थामधील तीन अशासकीय सदस्यांची नियुक्ती करावयाची आहे. तरी इच्छुक असलेल्या व्यक्तीनी अर्ज व अर्जासोबत परिचयपत्र कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत १७ एप्रिल २०२५ पूर्वी सहायक आयुक्त समाज कल्याण मुंबई उपनगर प्रशासकीय इमारत ४ था मजला आर.सी. मार्ग चेंबूर (पू) मुंबई-७१ किंवा acswomumbaisub@gmail.com या ई-मेलवर अर्ज व परिचय पत्र पाठवावे.
अशासकीय सदस्य पात्रतेचे नियम पुढील प्रमाणे आहेत सदस्य अनुसूचित जाती जमातीचा असावा सदस्यास सामाजिक क्षेत्रात कार्य केल्याचा अनुभव असावा सदस्यास अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ कायद्याचे ज्ञान असावे विधी शाखेची पदवी (एलएलबी किंवाएलएलएम) असलेले सदस्यांना प्राधान्य राहील सदस्य मुंबई उपनगर जिल्ह्यात राहणारा असावा. अशासकीय सदस्यावर कोणताही गुन्हा दाखल नसावा. (पृष्ठार्थ पोलीस चारित्र पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे) असे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
****
शैलजा पाटील/विसंअ/