मुंबई, दि. २३ : ग्रामीण आणि शहरी भागातील व्यायामशाळा सुविधा अधिक बळकट करण्यासाठी व्यायामशाळा विकास अनुदान ७ लाखांवरून थेट १४ लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.
व्यायाम शाळा बांधण्यासाठी अनुदान मर्यादा २०१४ मध्ये २ लाखांवरून ७ लाख रुपये करण्यात आली होती. बांधकाम खर्चात झालेली वाढ लक्षात घेता ही मर्यादा १४ लाखांपर्यंत वाढविण्यात आली असल्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
०००
श्रद्धा मेश्राम/विसंअ/