महात्मा बसवेश्वर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले अभिवादन

मुंबई, दि. ३० : महात्मा बसवेश्वर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव सचिन कावळे, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, विजय शिंदे, राज्यातील शिवा संघटनेचे पदाधिकारी, मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी यांनीही महात्मा बसवेश्वर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.

0000