बुलढाणा,दि.1 (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयात नव्याने सुरु झालेले मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे उद्घाटन मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद जाधव पाटील यांच्या हस्ते आज झाले. यावेळी जिल्ह्यातील गरीब व गरजवंताना तातडीने मदत मिळण्यासाठी काम करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.
यावेळी आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी, माजी आमदार विजयराज शिंदे आदी उपस्थित होते.
000000