मुंबई, दि. 28 : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे भारतीय वायू सेनेच्या विमानाने दुपारी ३.३५ वाजता आगमन झाले.
त्यांचे स्वागत राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर-पाटणकर, अतिरिक्त पोलिस महासंचालक शेरिंग दोरजे, अतिरिक्त आयुक्त परमजीत सिंग दहीया, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर तसेच पोलिस व राजशिष्टाचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उपराष्ट्रपती यांनी पुढील नियोजित कार्यक्रमासाठी प्रयाण केले.
००००