मुंबई, दि. ३० : राज्य विधिमंडळाच्या सन २०२५ पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजास विधानपरिषदेत ‘वंदे मातरम्’ आणि राज्यगीताने सुरुवात झाली.
विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह मंत्री आणि विधानपरिषदेचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन मंत्री छगन भुजबळ यांचा सभागृहाला परिचय करून दिला.
000
संजय ओरके/विसंअ/