मुंबई, दि. २१ : राज्य शासनामार्फत गरजू रुग्णांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळावी, या उद्देशाने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष कार्यरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या कक्षामार्फत गरजूंना त्वरित आर्थिक मदत दिली जात आहे. या निधीची कार्यपद्धती, लाभार्थ्यांसाठीची प्रक्रिया आणि विविध आजारांसाठी मिळणाऱ्या सहाय्याबाबत सविस्तर माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे.
‘दिलखुलास’कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 22, बुधवार दि. 23 व गुरुवार दि. 24 जुलै 2025 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘News On AIR’ मोबाईल अॅंपवर प्रसारित होणार आहे. तसेच, ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात मंगळवार दि. 22 जुलै 2025 रोजी रात्री 8.00 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ही मुलाखत पाहता येईल. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत फेसबुक, एक्स आणि युट्यूब या समाजमाध्यमांवर देखील पाहता येणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.
X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR
Facebook: https://www.facebook.com/MahaDGIPR
YouTube: https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
मुख्यमंत्री सहाय्यता निधी ही राज्य शासनाची एक प्रभावी सामाजिक कल्याण योजना असून, ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गंभीर आजारांनी ग्रस्त व आपत्तीग्रस्त नागरिकांना वेळेवर मदत पोहोचवण्याच्या हेतूने कार्यरत आहे. राज्य शासनाच्या या उपक्रमामुळे आरोग्यसेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत असून, यामुळे हजारो गरजूंना नवसंजीवनी मिळत आहे. हा यशस्वी उपक्रम जनतेच्या हितासाठी सुरु असून, याचा अधिकाधिक लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन कक्ष प्रमुख श्री. नाईक यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमाच्या माध्यमातून केले आहे.
000
जयश्री कोल्हे/विसंअ/