“माझी माती, माझा बाप्पा” – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास कार्यशाळा

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीची उपक्रमशील संकल्पना

मुंबई, दि. २४ : गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग असून अलीकडेच त्याला राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात आले आहे. पर्यावरणपूरकतेचा संदेश देणाऱ्या गणेशोत्सवाची तयारी आता अधिक अर्थपूर्ण आणि सर्जनशील बनवण्याचा प्रयत्न पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी करत आहे. ‘माझी माती, माझा बाप्पा’ या नावाने एक विशेष कार्यशाळा ३ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे.

या उपक्रमात सहभागी होणाऱ्यांना त्यांच्या घरासाठी शाडू मातीपासून आपला गणपती स्वतः तयार करण्याची संधी मिळणार आहे. या कार्यशाळेत प्रख्यात शिल्पकार विशाल शिंदे आणि किरण थोरात मार्गदर्शन करणार असून सहभागी होणाऱ्यांसाठी कोणत्याही पूर्वानुभवाची अट नाही.

कार्यशाळेचा कालावधी :

🗓️ ३ ऑगस्ट २०२५

🕚 सकाळी ११ ते दुपारी २

प्रवेश शुल्क :

▪️ ₹१५०० – वय ५ ते ११ वर्षे

▪️ ₹१८०० – वय १२ वर्षांपासून पुढे

कार्यशाळेत १० इंचांपर्यंतच्या मूर्ती तयार करण्यावर भर दिला जाणार असून, सर्व साहित्य आयोजकांकडून पुरवले जाईल. शाडू मातीच्या मूर्ती घरी नेऊन सुकविल्यानंतर रंगभरणी करता येईल, यासाठीही मार्गदर्शन मिळणार आहे.

या उपक्रमामुळे सर्वांनाच  पर्यावरणाविषयी जागरूकतेचा अनोखा अनुभव मिळणार आहे. घरचा गणपती स्वतःच्या हाताने घडवण्याचे समाधान आणि आनंद हाच या कार्यशाळेचा खरा गाभा आहे. मर्यादित जागा उपलब्ध. आजच नोंदणी करून आपली उपस्थिती निश्चित करावी व कलात्मक आणि पर्यावरणपूर्वक गणेशमूर्ती घडवण्यात सहभागी व्हावे, असे आवाहन पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीकडून करण्यात येत आहे.

नोंदणीसाठी संपर्क :

📞 Call/WhatsApp : ९८१९८२५४०२, ८१६९८८२८९८

💳 QR कोडद्वारे पेमेंट करून आपली जागा आरक्षित करा.

📧 पेमेंटचा स्क्रीनशॉट pldeshpande111@gmail.com  या इमेलवर पाठवावा.

***