मुंबई, दि. २४ : बिहार मधील मतदार यादी पुनरावलोकन (SIR) मोहिमेअंतर्गत निवडणूक आयोगाने जोरदार तयारी केली असून, एकही पात्र मतदार वगळू नये हा उद्देश स्पष्ट केला आहे.
२० जुलै रोजी सर्व राजकीय पक्षांना मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून (BLO/ERO/DEO/CEO) ज्यांनी अद्याप फॉर्म भरले नाहीत, मृत मतदार, कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार यादी पुरविण्यात आली आहे
कोणताही मतदार किंवा राजकीय पक्ष १ सप्टेंबर २०२५ पर्यंत यादीतील त्रुटींबाबत दावा किंवा हरकत नोंदवू शकतो. आतापर्यंत ९९ टक्के मतदारांचा समावेश पूर्ण झाला असून २१.६ लाख मृत मतदारांची नोंद करण्यात आली आहे. ३१.५ लाख मतदार स्थलांतरित असल्याचे आढळले आहे. ७ लाख मतदारांची नावे एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंदवलेली आहेत. १ लाख मतदार शोधूनही सापडले नाहीत. घरोघरी भेटी देऊनही ७ लाखांहून अधिक मतदारांचे अर्ज अद्याप प्राप्त झालेले नाहीत.
आतापर्यंत ७.२१ कोटी (९१.३२%) मतदारांचे अर्ज प्राप्त व डिजिटाइझ करण्यात आले असून, त्यांचा समावेश मसुदा मतदार यादीत केला जाणार आहे. ही मसुदा मतदार यादी १ ऑगस्ट २०२५ रोजी प्रसिद्ध होणार असून, ती मुद्रित व डिजिटल स्वरूपात सर्व १२ राजकीय पक्षांना दिली जाईल. यासोबतच ही यादी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध असेल, अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
000
संजय ओरके/विसंअ/