मुंबई, दि. २८ : दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त प्रातिनिधिक स्वरूपात शिक्षकांना क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सन २०२५ च्या पुरस्कारासाठी इच्छुक शिक्षकांनी ३१ जुलै २०२५ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षण संचालक महेश पालकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
या पुरस्कारासाठी राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व मान्यताप्राप्त अनुदानित खासगी प्राथमिक / माध्यमिक / उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांनी आपली आवेदने ३१ जुलै २०२५ रोजी सायं. ५.०० वाजेपर्यंत https://forms.gle/ixTDiuvgqqEwVuaA7 या लिंकवर ऑनलाईन सादर करावीत, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
0000
मोहिनी राणे/ससं/