पवई येथील भूखंडसंदर्भात दाखल निवेदनाबाबत अभ्यासानंतर कार्यवाही – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

मुंबई, दि. 29 : पवईतील पासपोली येथील भूखंडाबाबत दाखल निवेदनासंदर्भात महानगरपालिका आयुक्तांसोबत चर्चा व विहित नियमावलीच्या अभ्यासानंतर उचित कार्यवाही करण्यात येईल, असे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सांगितले.

विधानभवनात पवई येथील भूखंड संदर्भात बैठक झाली. यावेळी  अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर , जल अभियंता मंगेश शेवाळे व रा.डी. वझिफदार असोसिएट्सचे श्री. दरायुष आर. वझिफदार उपस्थित होते.

उपाध्यक्ष अण्णा बनसोडे  म्हणाले,  उच्च न्यायालयाने  पवइ तलाव संवर्धन प्रकल्पाच्या अनुषंगाने संबंधित भूखंडांविषयी निर्देश दिले. त्यानुसार जागेचा ताबा घेण्यात आला. मात्र याबाबत आक्षेप दाखल झाला असल्याने याबाबत महानगरपालिका आयुक्तांसोबत चर्चेनंतर कायदेशीर बाबींचा विचार करून पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही श्री. बनसोडे यांनी सांगितले.

उच्च न्यायालयाने 19 जुलै 2016 रोजी संबंधित प्राधिकरणांना पवई तलावाच्या संवर्धन व सौंदर्यीकरणासाठी योजना तयार करण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार एकूण 14 जागा विविध व्यक्ती/संस्था यांना भाडेतत्त्वावर देण्यात आल्या होत्या. त्यापैकी 05 जागा रस्ता रुंदीकरणासाठी परत घेण्यात आल्या. संबंधितांना नोटिसा देऊन कारण दाखवा आदेशही काढण्यात आले. एमएमसी कायदा कलम 488 अंतर्गत कारवाईत 16 ऑक्टोबर 2024 रोजी जागेचा ताबा घेण्यात आला, अशी माहिती यावेळी देण्यात दिली.

0000

मोहिनी राणे/ससं/