मुंबई, दि. 29 : मूळ भाडेपट्टा करारातील अटी व शर्तींचा भंग झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित संस्थेकडून दंडाची रक्कम निश्चित करून त्यासंदर्भातील सविस्तर अहवाल तातडीने सादर करावा, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.
विधानभवन येथील दालनात बोरीवली येथील शिक्षणसंस्था आणि म्हाडा यांच्यातील भाडेपट्टा करारासंदर्भात बैठक झाली. यावेळी संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
00000
मोहिनी राणे/ससं/